नांदगाव येथील रघुनाथ महाराज देवाची उद्या यात्रा – changbhalanews
आपली संस्कृती

नांदगाव येथील रघुनाथ महाराज देवाची उद्या यात्रा

धार्मिक व भरगच्च मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
नांदगाव ता.कराड येथील श्री रघुनाथ महाराज देवाची यात्रा बुधवार दिनांक १३ रोजी होत आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक व मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दिनांक १३ रोजी सायंकाळी ५ वाजता मुख्य धार्मिक विधी केले जाणार आहेत. तर रात्री ९ वाजता देवाचा छबिना (पालखी मिरवणूक) काढण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक १४ रोजी सकाळी १० वाजता मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा होणार असून दुपारी ३ वाजता कुस्तीचे मैदान होणार आहे .रात्री ९ वाजता ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे.

त्याचबरोबर शुक्रवार दिनांक १५ रोजी रात्री ९ वाजता मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमात पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close