सह्याद्री’मध्ये दुसऱ्या टप्प्यात येणार ‘हा’ राष्ट्रीय प्राणी – changbhalanews
निसर्गायन

सह्याद्री’मध्ये दुसऱ्या टप्प्यात येणार ‘हा’ राष्ट्रीय प्राणी

संवर्धनासाठी मिळाली 'इतक्या' निधीला मंजुरी

कराड | प्रतिनिधी
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचे पुनर्वसन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यास केंद्राच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समिती (एन. टी.सी.ए.) कडून मंजुरी देण्यात आली आहे. त्याअंतर्गत सदर व्याघ्र पुनर्वसन प्रकल्पास राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीकडून 10.50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी 2024 मध्ये सह्याद्रीमधील वाघांना अन्य जंगलातील आणण्यात येणारे कायमचे नवे सवंगडी मिळणार आहेत.
साताऱ्यासह सांगली कोल्हापूर या तीन जिल्ह्यात विस्तारलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली होती. प्रकल्पात सर्वप्रथम 2014 मध्ये वाघांच्या पाऊलखुणा आढळून आल्या. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीच्या तीन सदस्यांनी भेट दिल्यानंतर प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात साधारणपणे 5 वाघांचा वावर असल्याचे सांगितले गेले होते. यादरम्यान गेल्या काही वर्षात व्याघ्र प्रकल्पातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नोंदीनुसार वाघांची संख्या वाढून साधारणपणे 8  वाघांचा वावर असल्याचे समोर आले होते. दक्षिणेकडून या प्रकल्पात सातत्याने वाघांची ये-जा सुरू असते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीच्या धोरणानुसार व्याघ्र संवर्धनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी वाघ पुनर्प्राप्ती धोरण आणि 2027 पर्यंतची दीर्घकालीन देखरेख यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीकडून 10.50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याला आता सुरुवात होत आहे. सदर प्रकल्प अध्यक्ष हे महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) हे असणार आहेत, तर प्रकल्प समन्वयक हे डॉ व्ही.क्लेमेंट बेन (अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक पश्चिम वन्यजीव विभाग मुंबई ) हे असणार आहेत. प्रकल्पाचे कार्यकारी क्षेत्र संचालक व उपसंचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर/कराड असणार आहेत.
सदर प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक व मुख्य शास्त्रज्ञ भारतीय वन्यजीव संस्था डेहराडूनचे के. रमेश व सह-अन्वेषक सह शास्त्रज्ञ डॉ नावेंदू पागे, डॉ. प्रशांत महाजन हे असणार आहेत.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close