कराड तालुक्यातील ‘या’ कारखान्यात गळीत हंगामासाठी झाले मिल रोलरचे पूजन

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्यात येत्या गळीत हंगामासाठी संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी ‘जयवंत शुगर्स’चे सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर, उपसरव्यवस्थापक (टेक्निकल) आर. आर. इजाते, सरव्यवस्थापक (फायनान्स) व्ही. आर. सावरीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
धार्मिक विधी झाल्यानंतर डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ‘जयवंत शुगर्स’चे चीफ इंजिनिअर एच. एम. नदाफ, चिफ केमिस्ट बी. जी. चव्हाणके, सिव्हिल इंजिनिअर एस. एच. शेख, डिस्टीलरी मॅनेजर व्ही. जी. म्हसवडे, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर ए. बी. खटके, मुख्य शेतकी अधिकारी आर. जे. पाटील, प्रशासकीय अधिकारी आर. टी. सिरसाट, ई.डी.पी. मॅनेजर ए. एल. काशीद, एच. आर. मॅनेजर एस. एच. भुसनर, पर्चेस ऑफिसर पी. एस. जाधव, मटेरियल मॅनेजर जी. एस. बाशिंगे, सेफ्टी ऑफिसर एस. व्ही. शिद, असि. सेल्स ऑफिसर वैभव मोहिते यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.