सराईतपणे गुन्हे करणाऱ्या टोळीतील दोघेजण दोन वर्षाकरीता सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यातून तडीपार
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख संशयित १) जयदिप सचिन धनवडे, वय २२ वर्षे, २) हर्षद संभाजी साळुंखे, वय २२ वर्षे, दोन्ही रा. क्षेत्रमाहुली ता. जि . सातारा यांच्या टोळीवर सातारा शहर पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, चोरी करणे, खंडणी मागणे, दुखापत पोचवणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने सातारा शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मस्के यांनी सदर टोळीविरुध्द जिल्हा, पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती, पुरंदर तालुक्यातून, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, तालुक्यातून, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री. नवले उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा भाग सातारा यांनी केली होती.
सदर टोळीतील इसमांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील इसम हे सातारा शहर तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते. त्यांचेवर कायद्याचा कोणताच धाक न राहील्यामुळे सातारा शहर परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. अशा टोळीवर जनतेमधून कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. वरील टोळीला हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख यांच्यासमोर सुनावणी होवुन सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पूर्ण सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती, पुरंदर तालुक्यातून, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, तालुक्यातून, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश दिला आहे. नोव्हेंबर २०२२ पासून मपोकाक ५५ प्रमाणे ३० उपद्रवी टोळ्यांमधील ९६ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे २८ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ३ इसमांना असे एकुण १२७ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली आहे . एमपीडीए कायद्याअंतर्गत एका इसमावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे . भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्री.अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, सातारा शहर पोलीस ठाणेचे पोहवा दिपक इंगवले, संदीप पवार, पोकों अमोल सापते यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.