भाजप सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी हर्षवर्धन मोहिते – changbhalanews
राजकिय

भाजप सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी हर्षवर्धन मोहिते

बेलवडे येथे निवडीबद्दल ग्रामस्थांच्यावतीने सत्कार

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी बेलवडे बुद्रुक ता. कराड येथील युवा नेते हर्षवर्धन मोहिते यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल बेलवडे बुद्रुक ग्रामस्थ व विविध संस्थांच्यावतीने हर्षवर्धन मोहिते यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

हर्षवर्धन मोहिते यांचे भाजपचे पदाधिकारी म्हणून उल्लेखनीय काम राहिले आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांचे मोहिते हे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. मोहिते यांचे वडील व बेलवडे बुद्रुक गावचे माजी सरपंच स्व. मोहनराव मोहिते हे सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले तथा आप्पासाहेब यांचे विश्वासू कार्यकर्ते होते. त्यांचा राजकीय व सामाजिक क्षेत्रातील वारसा हर्षवर्धन मोहिते हे पुढे चालवीत आहेत. डॉ. अतुल भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन मोहिते यांच्यावरही भाजपचे कराड दक्षिण अध्यक्ष म्हणून महत्त्वाच्या जबाबदारी देण्यात आली होती. ती मोहिते यांनी समर्थपणे पेलली. पक्ष संघटना बांधणीसाठी त्यांनी दिलेले योगदान विचारात घेऊन पक्षाने त्यांची पदोन्नती करत भाजपाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी ही निवड जाहीर केली आहे.

या निवडीबद्दल बेलवडे बुद्रुक गावचे सरपंच डॉक्टर सुशांत मोहिते, माजी उपसरपंच पैलवान संभाजी मोहिते, अॅड. वसंतराव मोहिते, सागर मोहिते, प्रकाश मोहिते,
बेलवडे सोसायटीचे चेअरमन जयवंतराव मोहिते,
महेंद्र कांबळे, सुहास जाधव, बाजीराव वाघमारे, हनुमान सोसायटीचे व्हा. चेअरमन संजय मोहिते, भास्करआप्पा तडाके, मानसिंगराव मोहिते, महेश उर्फ बबलू मोहिते, रायसिंग मोहिते, रतनसिंह मोहिते, तानाजी वाघमारे सुधाकर सकटे, हनुमान सोसायटीचे संचालक दिनकर वाघमारे, गणेश मोहिते यांच्यासह तसेच ग्रामस्थांनी हर्षवर्धन मोहिते यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

हर्षवर्धन मोहिते यांच्या निवडीबद्दल य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, पै. धनाजी पाटील, संजय पवार, तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, कृष्णा उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हर्षवर्धन मोहिते यांचे अभिनंदन केले आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close