चाफळच्या प्रसिद्ध श्रीराम मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू – changbhalanews
आपली संस्कृती

चाफळच्या प्रसिद्ध श्रीराम मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
पाटण तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र चाफळ येथील श्रीराम मंदिराचे सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. यासाठी कोल्हापूर व उंब्रज येथील पटेल बंधूंनी मंदीराचे रंगकामासाठी सुमारे 10 लाखाचा निधी देत आपला प्रभुराम चरणी असलेला भक्तिभाव प्रकट केला आहे. पटेल बंधूंच्या या दातृत्वामुळे ‘चा प्रत्यय चाफळकरांना आला आहे.

यावेळी श्रीराम देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अमरसिंह पाटणकर, हरिभाई पटेल, दयाभाई पटेल, विनोदभाई पटेल, डॉ. पाटील, रतनसी पटेल, हिम्मतभाई पटेल, भावेश पटेल, ल. सि. बाबर, व्यवस्थापक बा. मा. सुतार, वैभव कुलकर्णी, अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

ऊन, वारा, पावसाचा बराचसा कालावधी ओलांडल्यामुळे मंदिराचा रंग निघून गेला होता. त्यामुळे मंदिराला रंगकाम करणे गरजेचे बनले होते. श्रीराम दर्शनासाठी आलेल्या कोल्हापूर व उंब्रज येथील पटेल बंधूंना याबाबत ट्रस्टने कल्पना दिली असता पटेल बंधूंनी या कार्याला तात्काळ होकार देत रंगकामास 10 लाख रूपयांचा निधी दिला. प्रत्यक्ष मंदीराचे रंगकामास प्रारंभ करण्यात आला असून लवकरच या मंदिराला नव्याने झळाळी येणार आहे . त्यामुळे भाविक भक्तांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. शुभारंभ प्रसंगी उपस्थितांचे आभार व्यवस्थापक बा. मा. सुतार यांनी मानले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close