कराड रोटरी क्लबच्या सुंदर हस्ताक्षर व वक्तृत्व स्पर्धेत ७५० विद्यार्थ्यांचा सहभाग
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
रोटरी क्लब कराड व रोटरॅक्ट क्लब कराड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने कै.चंद्रशेखर पांडुरंग करपे यांचे स्मरणार्थ रोटरी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आणि स्व.श्री पंजुराम, श्रीमती ईश्वरीबाई व रमेशदेव सचदेव यांचे स्मरणार्थ पंजेश्वरी रोटरी वक्तृत्व स्पर्धा येथील श्री शिवाजी विद्यालय, कराड आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत ३७ शाळामधून ७५० विद्यार्थ्यांनी भाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे प्रायोजक पांडुरंग करपे व वक्तृत्व स्पर्धेचे प्रायोजक रो.जयराम सचदेव, रो.संजय सचदेव यांनी बहुमूल्य सहकार्य केले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास रोटरी सभासद रो.अभयजी नांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पांडुरंग करपे, संजय सचदेव, रोटरी क्लब ऑफ कराड अध्यक्ष रो.रामचंद्र लाखोले, सचिव रो.आनंदा थोरात, रोट्रॅक्ट क्लब ऑफ कराड सिटी अध्यक्ष अझीम कागदी, सचिव प्रथमेश कांबळे यांची उपस्थिती होती.
डायरेक्टर लिटरसी रो.शिवराज माने व प्रोजेक्ट चेअरमन रो.राहुल पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या सुंदर हस्ताक्षर व वक्तृत्व स्पर्धेस ३७ शाळामधून ७५० विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला. सुंदर हस्ताक्षर व वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नेहा ढेकळे, डॉ.कोमल कुंदप, दादाराम साळुंखे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेसाठी रो.प्रशांत लाड, रो.राजगोंडा अपिने, रो.बद्रीनाथ धस्के, रो.गजानन माने, रो.किरण जाधव, रो.रघुनाथ डुबल, रो.देवानंद हुलवान, रो.प्रताप मोरे, रो.राजीव खलिपे, रो.डॉ.गजेंद्र पवार, रो.डॉ.राहुल फासे, रो.जयंत जगताप, रो.अभिजित गोडसे, रो.सुप्रभा पुरोहित व रोट्रॅक्ट सभासद रिद्धी जैन, दिव्या लांजेकर, मिहिका देसाई, दुर्वेश वाटेगांवकर, ऋषिकेशचव्हाण, आकांक्षा तिवारी, सिद्धी पाटील, प्रतीक सपकाळ आणि बाल सहकारी अंशुमन थोरात, अध्वय पुरोहित व प्रभास पुरोहित या सर्वांनी परिश्रम केले.