नेता नव्हे, माणुसकीचा देवदूत! आमदार अतुलबाबांच्या समयसुचकतेने वाचवला एक जीव!! – changbhalanews
राजकिय

नेता नव्हे, माणुसकीचा देवदूत! आमदार अतुलबाबांच्या समयसुचकतेने वाचवला एक जीव!!

शिरवळ , 22 जून 2025 | चांगभलं विशेष प्रतिनिधी

सत्तेच्या शिखरावर असतानाही संकटात सापडलेल्या सामान्य जनतेसाठी धावून जाणारे नेतृत्व विरळंच! अशीच एक घटना शनिवारी पुणे-बेंगलोर महामार्गावर शिरवळ येथे पाहायला मिळाली.
कराड दक्षिणचे आमदार व सातारा जिल्हा भाजपाचे अध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले हे पुण्याहून साताऱ्याकडे जात असताना महामार्गावर शिरवळजवळ अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर गर्दी त्यांनी आपला ताफा थांबवला. तिथे एक अपघातात जखमी झालेला तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला पाहताच आमदार डॉ. अतुलबाबांनी शासकीय ॲम्बुलन्सला संपर्क साधला, मात्र ॲम्बुलन्स उशिरा पोहोचत असल्याचे लक्षात येताच तात्काळ दुसऱ्या ॲम्बुलन्सची व्यवस्था करून दिली.

केवळ एवढ्यावरच न थांबता, अतुलबाबांनी आपल्या ताफ्यातील स्टाफसोबत जखमी तरुणाला शिरवळमधील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले आणि नंतर पुढील उपचारासाठी पुण्यात हलवले. जोपर्यंत जखमीच्या नातेवाईकांचा संपर्क झाला नाही, तोपर्यंत सगळी जबाबदारी अतुलबाबांनी स्वतः सांभाळली.

या माणुसकीच्या संवेदनशीलतेबद्दल जखमीच्या कुटुंबियांनी अतुलबाबांकडे कृतज्ञता व्यक्त केली. रुग्णाला आजारातून बरं करणं, स्वतःची कामे बाजूला ठेवून त्याच्यावर उपचार करणं आणि त्याला ठणठणीत बरं करणं हे डॉक्टरचं पहिलं कर्तव्य. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अतुलबाबांनी या घटनेत आपलं कर्तव्य तर पार पाडलंच पाडलं. पण जनतेचा लोकप्रतिनिधी जनतेच्याप्रती किती कार्यतत्पर असावा, हेही दाखवून दिलं. संकट समयी लोकांसाठी तत्परतेने धावून जाणारे आमदार म्हणून डॉ. अतुलबाबा भोसले यांची ही प्रतिमा अधिक बळकट झाली आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close