“साताऱ्यात साहित्याचा साज – स्वागताध्यक्षपदी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ऐतिहासिक निवड” – changbhalanews
आपली संस्कृतीराज्य

“साताऱ्यात साहित्याचा साज – स्वागताध्यक्षपदी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ऐतिहासिक निवड”

"वडिलांनंतर मुलगा स्वागताध्यक्ष – साताऱ्यात ऐतिहासिक क्षण!"

सातारा प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
साताऱ्याच्या मातीत साहित्याच्या सुवासिक पर्वाची सुरुवात होणार आहे. तब्बल ३२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) होणार असून, या ऐतिहासिक संमेलनाचे स्वागताध्यक्षपद सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे बहाल करण्यात आले आहे. ही माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

साताऱ्यातील मसाप शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन यांच्या प्रयत्नातून हे संमेलन साताऱ्यात खेचून आणले गेले. नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त बैठकीत ज्येष्ठ साहित्यिक किशोर बेडकिहाळ यांनी शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव सुचवले. त्यास डॉ. राजेंद्र माने, डॉ. उमेश करंबेळकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने त्यांच्या नावाला पाठिंबा दिला.

या बैठकीला मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, उपाध्यक्ष विक्रम पाटील, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कार्यवाह संजय माने, कोषाध्यक्ष सचिन सावंत, तसेच सदस्य वजीर नदाफ, आर.डी. पाटील, अमर बेंद्रे, सौ. ज्योती कुलकर्णी, सौ. अश्विनी जठार, अनिल जठार, तुषार महामूलकर उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मसापच्या स्थापनेपासून साताऱ्यातील साहित्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. Marathi as a Classical Language या मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक लाख पत्रे लिहिण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला होता. दिल्लीमध्ये आंदोलन करत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे ते एकमेव लोकप्रतिनिधी ठरले आहेत.
गेल्या १२ वर्षांपासून मसाप शाहूपुरी शाखेच्या प्रस्तावाला सातत्याने समर्थन देणाऱ्या शिवेंद्रसिंहराजेंच्या कार्याची दखल घेत त्यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली. महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरैय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार यांनीही त्यांच्या निवडीचे स्वागत केले.

दुर्मिळ दुग्धशर्करा योग!
१९९३ मध्ये पार पडलेल्या ६६व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिवंगत छ. अभयसिंहराजे भोसले होते. त्यानंतर आज त्यांचा मुलगा शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष होत असल्याने पित्यापाठोपाठ पुत्राच्या अध्यक्षपदाची ही ऐतिहासिक पुनरावृत्ती आहे. ही बाब संमेलनाच्या ९९ वर्षांच्या इतिहासात दुर्मीळच मानली जात आहे.

“माझ्या वडिलांनंतर मला हा बहुमान मिळाल्याने मी कृतज्ञ आहे. हे संमेलन केवळ साहित्याचे नव्हे, तर Marathi Identity and Pride यांचे प्रतीक ठरेल. शताब्दीपूर्व संमेलन भव्य आणि दिमाखदार करण्यासाठी साताऱ्यातील सर्व नागरिकांचा सहभाग आम्हाला मिळेल, याची खात्री आहे. देशविदेशातील मराठी बांधवांनी या संमेलनाला उपस्थित राहावे, अशी माझी विनंती आहे.”
शिवेंद्रसिंहराजे भोसले

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close