देशाच्या मजबुतीसाठी मोदींकडे नेतृत्व द्या ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – changbhalanews
राजकिय

देशाच्या मजबुतीसाठी मोदींकडे नेतृत्व द्या ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाटणला महायुतीची प्रचार सभा संपन्न

चांगभलं ऑनलाइन | पाटण प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक करून घेतल्यानंतर सिंहासनावर बसून राहिले नाहीत तर स्वराज्य विस्ताराकरिता त्यांनी घोड्यावर पुन्हा मांड ठोकली. त्याच पद्धतीने भारताला आणखी मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्याकडे तिसऱ्यांदा देशाचे नेतृत्व द्या , त्यासाठी साताऱ्यातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पाटण (जि. सातारा) येथे सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराजे देसाई, माजी आमदार नरेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, एडवोकेट भरत पाटील , रमेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, फत्तेसिंह पाटणकर, रामभाऊ डुबल, कविता कचरे, रवींद्र लाहोटी, नुरजा खाटीक, एडवोकेट मिलिंद पाटील, बशीरबाई खोंदू, मच्छिंद्र सकटे, दिलीपराव चव्हाण, प्रदीप पाटील, नंदकुमार सुर्वे, दिलीप महाडिक, सागर माने, धीरज कदम, एडवोकेट डी.पी. पाटील यांची उपस्थिती होती.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जलसिंचन मंत्री होते, तेंव्हा कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. मात्र आमच्या ताब्यातून सत्ता गेल्यानंतर काँग्रेसच्या काळात सर्व योजना ठप्प पडल्या होत्या. सगळीच कामं केली तर आपल्या मागे कोण येणार अशी काँग्रेसवाल्यांची मानसिकता राज्य व देशासाठी घातक ठरली. मात्र देशातील जनतेने परिवर्तन घडवून नरेंद्र मोदी यांच्या ताब्यात सत्ता दिली त्यानंतर जे काही परिवर्तन पाहायला मिळते आहे ते सर्वांसमोर आहे.

गेल्या दहा वर्षांमध्ये मोदींनी अत्यंत शांततेमध्ये क्रांती घडवून आणली. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या उसाला एफ आर पी निश्चित केली. काँग्रेस नेत्यांना सहकारी साखर कारखानदारीवर लागलेला इन्कम टॅक्स रद्द करता आला नाही. या दहा हजार कोटींच्या टॅक्समुळे कारखानदारी डुबली असती. परंतु राज्यातील शिष्ट मंडळ अमित शहा यांना भेटले, त्यांनी तात्काळ हा टॅक्स रद्द करून कारखानदारी जिवंत ठेवली आहे. नरेंद्र मोदी यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची हिंमत आहे. ती हिम्मत राहुल गांधीमध्ये नाही. तसेच तंजावर पासून पेशावरपर्यंत ज्या शिवछत्रपतींचे राज्य होते, त्या राजाच्या वारसाला म्हणजेच खासदार उदयनराजे भोसले यांना लोकसभेत पाठवण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हावे., असे आवाहनही फडणवीस यांनी केले.

उदयनराजे भोसले म्हणाले, भ्रष्टाचारी लोक मते मागायला येत असतील तर त्यांना त्यांच्याच भाषेत जाब विचारा. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कसलाही भेदभाव न करता सातारा जिल्ह्याचे सोने केले आहे. आता भ्रष्टाचारांच्या ताब्यात देश जाऊ नये, याची खबरदारी सगळ्यांनी घ्या. ज्यांनी आतापर्यंत जनतेला चिरडलं त्यांना चिरडण्याची वेळ आता आलेली आहे. मतदानाच्या निमित्ताने जनतेने आपला अधिकार दाखवून द्यावा. माझ्यात आणि माझ्या विरोधकांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे , त्यांच्यासारखं मी वागणार नाही. दरम्यान, कराड चिपळूण रेल्वे मार्ग झाल्यास व्यापार वाढेल, अशी मागणीही उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

शंभूराजे देसाई म्हणाले, नरेंद्र मोदी हे विकासाचं व्हिजन असलेलं नेतृत्व आहे. जिल्ह्यामध्ये महायुतीचे चार आमदार या निवडणुकीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी ताकदीने काम करत आहोत. त्यामुळे उदयनराजेंचा विजय हा निश्चित आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार द्यावा, अशी मागणीही मंत्री देसाई यांनी यावेळी केली.

विरोधकांकडे केवळ इंजिन, डबेच नाहीत….

महायुतीचे नरेंद्र मोदी हे नायक आहेत. त्यांच्याकडे विकासाची ट्रेन आहे तर विरोधकांकडे केवळ इंजिनचे डबे आहेत. मोदींच्या विकासाच्या ट्रेनमध्ये दीनदलित, अल्पसंख्यांक, ओबीसी, भटके विमुक्त, महिला या सर्वांसाठी जागा आहे तर विरोधकांच्या इंजिनमध्ये त्यांचे नेते आणि त्यांचे कुटुंब एवढेच बसू शकते, त्यांचे इंजिनही बंद पडलेले आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close