खासदार धीरज साहू यांच्या विरोधात कराडात भाजपची निदर्शने – changbhalanews
राजकिय

खासदार धीरज साहू यांच्या विरोधात कराडात भाजपची निदर्शने

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी

काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे नुकतीच ३०० कोटी पेक्षा जास्त बेहिशोबी संपत्ती सापडली आहे. त्याचा निषेध म्हणून कराडात सोमवारी भाजपने गांधी पुतळ्याजवळ निदर्शने केली.

काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो, भ्रष्टाचारी खासदाराला अटक करा आदी घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.तर यावेळी अनेक वक्त्यांनी भ्रष्टाचारी काँग्रेस चा यावेळी खरपूस समाचार घेतला.

यावेळी भाजपचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी,जिल्हाउपाध्यक्ष प्रमोद शिंदे,हर्षवर्धन मोहिते,तालुकाध्यक्ष धनाजी पाटील ,जिल्हासरचिटणीस सुनील शिंदे,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष भरत जंत्रे , कराड उत्तर मंडलाध्यक्ष शंकर शेजवळ, विश्वनाथ फुटाणे,सुहास चक्के,शैलेंद्र गोंदकर,रुपेश मुळे, धनाजी माने,तानाजी देशमुख,प्रदेश कार्यकारणी महिला मोर्चा सदस्य कविता कचरे,स्वाती पिसाळ, शीतल कुलकर्णी,मंजिरी कुलकर्णी,वर्षा सोनवणे,सारिका गावडे,कृष्णा चौगुले,सुरेश शेवाळे, उमेश शिंदे,सुनील नाकोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close