चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी निवडणुकीत मोठया मताधिक्याने विजय मिळवला. डॉ. भोसले यांना शुभेच्छा देण्यासाठी आज कृष्णा कॅम्पसमध्ये लोकांनी मोठी गर्दी केली होती.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोठया मताधिक्याने विजय मिळवला. विजयानंतर लोकांनी मतदारसंघात मोठ्या उत्साहात डॉ. अतुलबाबा भोसले यांचे स्वागत केले. तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अलोट गर्दी केली.
यावेळी बोलताना आ. डॉ. भोसले म्हणाले, कराड दक्षिणच्या लोकांनी मला भरभरून मते दिली. मला मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवले आहे. नागरिकांच्या सेवेसाठी मी सदैव कटिबद्ध आहे. कराड दक्षिण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सर्वोतोपरी सहकार्य करणार आहे.
याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक जितेंद्र पाटील, बाजीराव निकम, निवासराव थोरात, शिवाजीराव पाटील, ज्येष्ठ उद्योजक आर. टी. स्वामी, माजी संचालक ब्रम्हानंद पाटील, माजी जि.प. सभापती संजय देसाई, युवा नेते केदार पाटील, दीपक गावडे, राहुल यादव, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष भगवान पाटील, पैलवान आप्पासाहेब कदम, गजेंद्र पाटील, अरविंद पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश पाटील, डॉ. सुरेश सुकरे, सुनील पोळ, मोहनराव जाधव, दिलीप पाटील, मलकापूरचे माजी सभापती राजेंद्र यादव, माजी नगरसेवक हणमंतराव जाधव, कान्हा लाखे, सुरेश शेवाळे, युवराज पवार, राजेश जाधव, भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, रुपेश मुळे, मुसेद्दीक अंबेकरी, स्वाती पिसाळ, कुबेर माने, प्रमोद जाधव, दीपक जाधव, शशिकांत जाधव, प्रमोद शिंदे, प्रशांत कुलकर्णी, मंजिरी कुलकर्णी, भारत जंत्रे, कविता कचरे, डॉ. सारिका गावडे, सुनील पोळ, जयवंत शेवाळे, डॉ. सुशांत मोहिते, धनाजी पाटील, राजेंद्र शिंगण, प्रमोद पाटील यांच्यासह कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.