डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासाठी वॉर्ड क्रमांक 4 मध्ये कार्यकर्त्यांची प्रचार फेरी ; डोअर टू डोअर संवाद

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या निवडणूक प्रचारासाठी भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, माजी नगराध्यक्ष रोहिणीताई शिंदे यांच्या समवेत वार्ड क्रमांक चार मध्ये प्रचार फेरी काढून डोअर टू डोअर मतदारांशी संवाद साधला.
या प्रचार फेरीत शिवाजी हाऊशिंग सोसायटी येथील बूथ क्र.११८,११९,१२० मध्ये घरोघरी जाऊन डॉ. अतुलबाबा यांचे निवडणूक पत्रक वाटण्यात आले. या वाॅर्डात जनतेमध्ये मोठया प्रमाणात प्रतिसाद दिसून आला. आम्ही अतुलबाबांनाच यावेळी निवडून देणार आहोत, असा विश्वास अनेकजण व्यक्त करत होते.
यावेळी शहराध्यक्ष एकनाथ बागडी, नगराध्यक्षा रोहिणीताई शिंदे, रमेश मोहिते, सौ.स्वाती पिसाळ, शिवसेनेचे रणजित पाटील (नाना), प्रमोद शिंदे , सौ.मंजिरी कुलकर्णी, सौ.स्वाती मोहिते, सौ.मेघा संसुद्दी, सौ.अनघा कुलकर्णी, सौ. नीलाखे मॅडम, सौ.संजना शिंदे, सौ.तेजल शहा, अनुश्री जाधव, मनीषा पवार, मोहिनी कलबर्गी, रोहिणी साळवी, डॉ. स्वाती थोरात,
मनीषा पवार, भाजपाचे कराड शहर सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, सरचिटणीस किसन चौगुले, मुकुंद चरेगावकर, सागर लादे, कराड शहर सचिव राजेंद्र खोत, अभिषेक भोसले, मदन भोसले, भावेश शहा, सुधिर कांबळे, श्रीकांत शिंदे, रणजित शिंदे, राहुल आवटी, रमेशभाऊ जाधव , अर्जुन जाधव, सोपान तावरे, विजय शिंदे, सागर पाटील, महेश पाटील, रोहित पंडित, दिलीप पाटील , राहुल पाटील, महेश पाटील (भाऊ) , धनंजय खोत , विजय पाटील, रमेश जाधव , अजय संसुद्दी,,नयन शिंदे, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचार फेरीत सहभागी झाले होते.