कराड शेती उत्पन्न बाजार समिती आवारातील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न. – changbhalanews
Uncategorized

कराड शेती उत्पन्न बाजार समिती आवारातील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न.

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्ड आवारातील अंतर्गत सर्वच रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ जेष्ठ व्यापारी व विविध संस्थाचे पदाधिकारी यांच्या शुभहस्ते आणि रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन,युवा नेते ॲड.उदयसिंह पाटील,यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी संपन्न झाला.

बाजार समितीच्या स्वनिधीतून होणाऱ्या रस्ता डांबरीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील,उपसभापती संभाजी काकडे,संचालक सतीश इंगवले,संभाजी चव्हाण,नितीन ढापरे,राजेंद्र चव्हाण,जयंतीलाल पटेल,जे.बी.लावंड,सर्जेराव गुरव,विजयकुमार कदम,गणपत पाटील,संचालिका श्रीमती इंदिरा जाधव-पाटील,सौ.रेखाताई पवार,रयत संघटनेचे प्रा.धनाजी काटकर,कराड ख.वि.संघाचे चेअरमन अनिल मोहीते,कोयना बँकेचे चेअरमन रोहीत पाटील,स्वा.सै.शामराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे,रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक,मक्तेदार उदय डी जाधव तसेच बाजार समितीचे सर्व कर्मचारी,आडते,व्यापारी,हमाल व मापाडी यांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी बोलताना अँड.उदयसिंह पाटील म्हणाले की,बाजार समितीच्या मुख्य मार्केट आवारामधील संपूर्ण अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण होणेबाबत व्यापारी वर्गाची मोठया प्रमाणात मागणी होत होती.त्यामुळे या आवारातील अंदाजे 1500 मीटर लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण स्वनिधीतून करण्याचा निर्णय बाजार समितीच्या संचालक मंडळाने घेतला होता.त्या कामाचा शुभारंभ संपन्न होऊन डांबरीकरणाचे काम लवकरच पूर्णतःवाला जात असल्याचा मनस्वी आनंद होत आहे.येथून पुढेही शेतकरी,व्यापारी यांचे हित डोळयासमोर ठेवून त्यांच्या समस्या सोडवण्याकरिता विद्यमान संचालक मंडळ सतत प्रयत्नशील राहील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close