पुणे-बेंगलोर महामार्गावर एसटी घुसली नाल्यात – changbhalanews
क्राइम

पुणे-बेंगलोर महामार्गावर एसटी घुसली नाल्यात

सुदैवाने ५० प्रवासी बचावले : कराडनजिक दोन तास ट्रॅफिक जाम

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड नजिकच्या मलकापूर शहराच्या हद्दीत आज शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास इस्लामपूर आगाराच्या एसटीचा स्टेरिंगचा रोड तुटल्याने रस्त्याकडेच्या नाल्यात जाऊन एसटी घुसली. या अपघातात एसटीतील ५० प्रवासी सुदैवाने बचावले. मात्र एसटीचं मोठं नुकसान झालं.

इस्लामपूर आगाराची एसटीबस पुणे-बेंगलोर महामार्गावरून प्रवास करत असताना मलकापूर शहरातील लोटस फर्निचरच्या समोर शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एसटीच्या स्टेरिंगचा अचानक रोड तुटला , त्यामुळे एसटी वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याकडेच्या नाल्यातील खड्ड्यात जाऊन एसटी अपघातग्रस्त झाली. या बसमधून पन्नास प्रवासी प्रवास करत होते. मात्र त्यामधील कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

अपघातग्रस्त एसटीचा अडथळा क्रेनच्या साह्याने डीपी जैन कंपनीचे पीआरओ दस्तगीर आगा, जगन्नाथ थोरात, वाहतूक पोलीस कर्मचारी काटरे तसेच कंपनीचे ट्राफिक मार्शल यांनी सहकार्य करून अपघातग्रस्त एसटीचा अडथळा दूर केला. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली, मात्र तोपर्यंत लोटस फर्निचरपासून ते पाटण ते तिकाटणेपर्यंत आणि पाचवड फाट्यापर्यंत वाहनांच्या सुमारे दोन तास रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. प्रवासी व वाहनधारकांचीही मोठी गैरसोय झाली.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close