कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या दिवशी 22 नामनिर्देशनपत्रांची विक्री तर जिल्ह्यात 7 उमेदवारी अर्ज दाखल
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करणेचे कामकाज 22 ऑक्टोबर रोजीपासून सुरु झाले असून पहिल्या दिवशी 30 नामनिर्देशन पत्र वाटप झालेले असून, आज दुसऱ्या दिवशी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 15 जणांनी एकूण 22 नामनिर्देशनपत्रे घेतली असून आज अखेर एकूण 52 नामनिर्देशन पत्राचे वाटप झालेची माहिती 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, नायब तहसीलदार हेमंत बेसके यांनी दिली.
अधिक माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले की, आज दिनांक 23 ऑक्टोबर अखेर खुल्या प्रवर्गातील 30, अनुसूचित जातीतील 17, अनुसूचित जमाती 0, अपक्ष उमेदवार 23, पक्षीय उमेदवार 17 इ. जणांनी अर्ज खरेदी केले आहेत. यामध्ये नॅशनॅलिस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून 1 अर्ज, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पार्टीकडून 4 अर्ज, बहुजन समाज पार्टीकडून 4 अर्ज, बहुजन समाज पार्टी (मायावती) कडून 1 अर्ज, शिवराज युवक संघटना (महाराष्ट्र) कडून 1 अर्ज,, महाराष्ट्र नवनिर्माण सेने पार्टीकडून 1 अर्ज,, वंचित बहुजन आघाडी पार्टीकडून 1 अर्ज, राष्ट्रीय समाज पक्षा कडून 1, भारतीय जनता पार्टी कडून 2 अर्ज, स्वाभिमानी पक्ष शेतकरी संघटणा यांचेकडून 1 अर्ज, अपक्ष -23 अर्ज असे अर्ज खरेदी केले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी 7 नामनिर्देशनपत्र दाखल
विधानसभा निवडणूक 2024 साठी नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज दि. 23 ऑक्टोंबर रोजी 6 उमेदवारांचे 7 नामनिर्देशपत्र भरली आहेत.
255- फलटण विधानसभा मतदार संघासाठी एक , 257- कोरेगाव मतदार संघासाठी दोन उमेदवारांचे तीन , 258-माण एक, 259 कराड उत्तर दोन नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे. असे एकूण 7 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.
निवडणूक खर्च निरीक्षक अरुणकुमार यादव जिल्ह्यात दाखल
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खर्च निवडणूक निरीक्षक अरुणकुमार यादव सातारा जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांची नेमणूक कोरेगाव, माण, फलटण व वाई या मतदार संघासाठी झाली आहे. ते आयकर विभाग आग्रा येथे कार्यरत आहेत. आज त्यांनी कोरेगाव, माण, फलटण व वाई मतदार संघाचा दौरा केला असून प्रांताधिकारी तसेच सहायक खर्च निरिक्षक यांचेसमवेत बैठकी घेतलेल्या आहेत. श्री. अरुणकुमार यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9422658175 असा असून त्यांचा मुक्काम सर्कीट हाऊस सातारा येथे आहे.