तांबवेतील जातीय सलोखा राज्याला आदर्शवत : महेंद्र जगताप
मुस्लीम समाजातर्फे करण्यात आली गणेशाची आरती
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
समाजातील सलोखा कायम रहावा, एकमेकांबद्दल आपुलकी निर्माण होवुन गावा-गावातील सलोख्याचे वातावरण आणि एका कायम रहावी या हेतुने तांबवे (ता. कराड) येथील संगम गणेश मंडळाने राबवलेला उपक्रम सातारा जिल्ह्यासमोरच नव्हे तर राज्यासमोर आदर्शवत आहे. हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादीय असुन त्यातुन जातीय सलोखा कायम राहण्यास मदत होईल, असे प्रतिपादन कऱ्हाड तालुका पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी केले.
तांबवे येथील संगम गणेश मंडळाच्यावतीने मुस्लीम समाजाच्यावतीने श्री गणेशाची आरती करण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते. सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभुते, पोलिस उपनिरीक्षक भिलारी, सरपंच शोभाताई शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, उपसरपंच अॅड. विजयसिंह पाटील, ग्रामपंचायत सदस्य धनंजय ताटे, माजी जिल्हा परिषद सदस्या विजयाताई पाटील, आण्णासाहेब पाटील, इंदुताई पाटील, डॉ. एम. एन. संदे, वजीर संदे, माजी सरपंच जावेद मुल्ला, राजुबा संदे, आश्रफ मुल्ला, समीर मुल्ला, सुरज तांबोळी, रसुल मुल्ला, माजी मुख्याध्यापक पी. एम. पवार, बी. बी. शिंदे, शंकर पाटील, निवृत्त पोलिस निरीक्षक छगन जाधव, तात्यासाहेब पाटील, गुणवंत पाटील, दत्तात्रय भोसले, मुख्याध्यापक आबासाहेब साठे देवानंद राऊत, विलासराव देसाई यांच्यासह गावातील ग्रामस्थ, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिस निरीक्षक जगताप म्हणाले, तांबवेत मुस्लीम समाजाच्यावतीने श्री गणेशाच्या आरतीचे नियोजन केले जाते ही खुप मोठी गोष्ट असुन ती जिल्ह्यासाठीच नव्हे तर राज्यासाठी आदर्शवत आहे. आपल्या बुजुर्ग लोकांनी आपली पंरपरा जपण्याचे काम अनेक वर्षापासुन केले आहे. सध्या सोशल मिडीयाचा जमाना आहे. त्याला बळी न पडता यापुढे हिंदु-मुस्लीम एेक्याचे दर्शन घडवण्यासाठी प्रत्येकाने पुढे केले आहे. गावामध्ये शांतता कशी राहिल याकडे सर्वांनी कटाक्षाने लक्ष ठेवले पाहिजे. सहाय्यक गटविकास अधिकारी विभुते यांनी अशा मंडळाची समाजात आज गरज असल्याचे सांगीतले. डॉ संदे, अतुल पाटील, शंभुराज पाटील यांनी मंडळाच्या उपक्रमाबद्दल कौतुक केले. मंडळाचे अध्यक्ष मंगेश पाटील, सचिव गणेश देसाई, शरद पवार, सुरेश फिरंगे यांनी स्वागत केले, अॅड. पाटील यांनी प्रास्तविक केले. सतीश यादव यांनी सुत्रसंचालन केले. मंगेश पवार यांनी आभार मानले.
या रत्नांचा झाला सन्मान
तांबवे गावासह परिसरातील तरुणांनी आपल्या कर्तुत्वाने त्यांचे आणि गावाचे नाव राज्यातच नाही तर देशपातळीवर पोहचवले आहे, असे राष्ट्रीय खेळाडु प्राची देवकर, अर्थव ताटे, निकीता पवार, राष्ट्रीय प्रशिक्षक अतुल पाटील, पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झालेले नंदकुमार पाटील, मंत्रालयात निवड झालेले सुमित पाटील, तामीळनाडु विद्यापिठाची डीलीट पदवी मिळालेले शंभूराज पाटील, सैन्यदलात भरती झालेले आकाश फल्ले, शुभम पाटील, फार्मासिस्टपदी निवड झालेल्या स्मिता पाटील आणि मुंबई पोस्ट खात्यात निवड झालेले स्वप्नील पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.