कराड अर्बन बझारमध्ये आता सभासदांना खरेदीवर ‘इतकी’ सवलत ; संस्थेच्या 33 वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणा – changbhalanews
Uncategorized

कराड अर्बन बझारमध्ये आता सभासदांना खरेदीवर ‘इतकी’ सवलत ; संस्थेच्या 33 वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड अर्बन बझारची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पंकज मल्टीपर्पज हॉल येथे रविवारी दि. २८ रोजी संपन्न झाली. या सभेत कराड अर्बन बझारमध्ये सभासदांना खरेदीवर 10 ते 15 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सौ. सायली समीर जोशी होत्या. प्रास्ताविकपर मनोगतामध्ये त्यांनी सभासद, ग्राहक व हितचिंतक यांच्याकडून मिळालेल्या सहकार्यानेच संस्थेची प्रगती होत असल्याचे सांगितले.

सभासदांना खरेदीवर १० टक्के ते १५ टक्केची सवलत देण्याचा निर्णय यावेळी जाहिर करण्यात आला. सभेपुढील सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. सभेस अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव, बझारचे सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.

जनरल मॅनेजर युनूस सुतार यांनी सभेचे नोटीस वाचन केले. अर्बन बझारच्या उपाध्यक्षा सौ. जयश्री गुरव यांनी आभार मानले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close