साताऱ्याच्या पोलीस उपनिरीक्षकांना राष्ट्रपतीपदक प्रदान
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा येथील जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक संभाजी सुदाम बनसोडे यांना त्यांचे ३० वर्षाचे गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल यांच्या हस्ते राष्ट्रपतीपदक प्रदान करण्यात आले.
संभाजी सुदाम बनसोडे हे सातारा जिल्हा पोलीस दलात सन १९९० साली पोलीस शिपाई या पदावर ‘भरती होवून ते सध्या पोलीस उपनिरीक्षक या पदावर जिल्हा विशेष शाखा येथे कर्यरत आहेत. त्यांनी पोलीस मुख्यालय सातारा, जिल्हा विशेष शाखा, पांचगणी पोलीस ठाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा इत्यादी ठिकाणी उत्कृष्ठ सेवा बजाविली आहे.
पोलीस दलात काम करताना जिल्हा विशेष शाखा व लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील त्यांचे काम उल्लेखनीय राहिले आहे. आज पर्यंतच्या सेवाकालावधीत वेळोवेळी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीकरीता त्यांना ३८० बक्षिसे मिळालेली आहेत. या त्यांच्या उल्लेखनीय कामकाजाबाबत त्यांना सन २०१६ मध्ये पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पोलीस पदक प्राप्त झालेले असून आज पर्यंत त्यांनी ३४ वर्षे उल्लेखनीय केलेल्या सेवेबद्दल सन २०२२ मध्ये देशाच्या महामहीम राष्ट्रपती महोदयांकडून गुणवत्तापुर्ण सेवेचे राष्ट्रपतीपदक जाहीर करण्यात आले होते. सदर पदक दरबार हॉल राजभवन मुंबई येथे झालेल्या समारंभात महाराष्ट्राच्या महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते बनसोडे यांना प्रदान करण्यात आले.
याबद्दल सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, मुख्यालयातील पोलीस उपाधीक्षक सबनीस यांनी उपनिरीक्षक बनसोडे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.