*महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाचे उत्कृष्ट तलाठी प्रशस्तीपत्र श्री. डी.आय .दुर्केवार यांना प्रदान*
*महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाचे उत्कृष्ट तलाठी प्रशस्तीपत्र श्री. डी.आय .दुर्केवार यांना प्रदान*
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी सविता चंद्रे
उमरखेड तहसिल कार्यालय येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तहसील कार्यालय येथे महसूल व वन विभाग प्रशस्तीपत्र उत्कृष्ट तलाठी म्हणून श्री डी.आय. दुर्केवार यांना आमदार मा. श्री. नामदेवराव ससाने, उपविभागीय अधिकारी मा. श्री. स्वप्नील कापडनिस साहेब, तहसिलदार मा. श्री. रुपेश खंडारे साहेब, ठाणेदार मा. श्री. बोडखे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आपल्या जिवाची पर्वा न करता करोना क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष पॉजिटीव्ह रुग्नाची सेवा करण्याचे काम ते मागील 5 महिन्यापासुन सतत करीत आहेत. याशिवाय रोटरी सारख्या अंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात व करोना काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली त्याबद्दल मा. श्री. एम. देवेंद्र सिंह साहेब जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी त्यांच्या कामाची प्रशंसा व कौतुक म्हणुन श्री. दुर्केवार यांना सन 2019-20 या वर्षांतील उत्कृष्ट तलाठी म्हणून प्रशस्तीपत्र प्रदान केले आहे. श्री दुर्केवार तलाठी साहेबाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.