विजय दिवस समितीकडून स्वराज्याच्या सरसेनापतींना अभिवादन

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
तळबीड (ता. कराड) येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी विजय दिवस समारोह समिती व तळबीड ग्रामस्थांच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
भारताने बांग्लादेश युध्दात मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ दरवर्षी कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतुन येथे मोठ्या दिमाखात विजय दिवस समारोह साजरा केला जातो. विजय दिवसाच्या आजच्या मुख्य दिवशी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड येथील समाधीस्थळी विजय दिवस समारोह समिती व तळबीड ग्रामस्थांच्यावतीने अभिवादन करण्यात येते. आज सकाळी माजी केंद्रीय कायदा मंत्री अॅड. रमाकांत खलप, विजय दिवसचे संस्थापक कर्नल पाटील, कर्नल समीर कुलकर्णी, कवी दशरथ परब, लेखक सोमनाथ पंथ, पत्रकार सागर जावडेकर, समितीचे सचीव अॅड. संभाजीराव मोहिते, सहसचीव विलासराव जाधव, सरपंच मृणालिनी मोहिते, उपसरपंच वैशाली पाडळे, सुभेदार बाबासाहेब जाधव, मुख्याध्यापक बी. एस. भोसले, ग्रामसेवक सुनिल ढाणे, विक्रमसिंह मोहिते, पोलिस बॅण्डचे जनार्दन खंडाळे, शामराव मोहिते, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल मोहिते, माजी सैनिक सुधाकर वाघमारे, खाशाबा वाघमारे, संजय वाघमारे, माजी सरपंच जयवंत मोहिते, अॅड. परवेज सुतार यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले.