काँग्रेस अल्पसंख्याक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी झाकीर पठाण यांची निवड
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांची अल्पसंख्याक सेलच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगडी यांनी ही निवड केली असून याबाबतचे पत्र झाकीर पठाण यांना देण्यात आले आहे.
झाकीर पठाण हे गेली 35 वर्षे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली होती. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत राष्ट्रीय काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभाग उपाध्यक्ष व महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी माननीय मोहम्मद अहमद खान यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. आमदार वजहद मिर्झा यांनी त्यांना पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष करण्याकरिता शिफारस केली होती त्यांच्यावर आता पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार इम्रान प्रतापगडी ,आमदार वझाजात मिर्झा, मा. आमदार एम एम शैख, मा.आमदार मुझफर हुसैन, डॉ सुरेश जाधव, रणजितसिंह देशमुख, संजय तडाखे , राहुल काळोखे, रजिया शेख, इचलकरंजीचे नगरसेवक इम्रान मकानदार यांच्यासह काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.