एजेज गुरुकुल प्री स्कूलच्या चित्रकलेला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एजेज गुरुकुल प्री स्कुल, गजानन हौसिंग सोसायटी कराड व आर्किटेक्ट अजित डांगे यांच्यातर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने अशा स्पर्धा संस्थेमार्फत घेतल्या जातात. पहिली ते दहावी या वर्गासाठी या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या.
संपूर्ण जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी साधारण पाचशे मुलांनी सहभाग घेतला होता. रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी असे बक्षिसाचे स्वरूप होते, त्याचबरोबर प्रत्येक सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली.
कै. श्नी. या शिवाजी सुतार सर करवडी, किरण मोबाईल शॉप शंभूतीर्थ चौक कराड, बेबी वर्ल्ड, कुसुरकर इंडस्ट्रीज, कै. श्नी. आनंदा दत्तू कदम वाघेरी यांच्या स्मरणार्थ, कै. सौ. शालन जालिंदर महाडिक टेंभू यांच्या स्मरणार्थ, श्री सोमनाथ खाडे बोत्रेवाडी कुंभारगाव, श्री सुधीर पिसाळ करवडी, श्री अमर शशिकांत शेडगे ओगलेवाडी, कु नित्या स्वप्नील थोरात कार्वे, श्री गणेश जांभळे ओगलेवाडी, मंगलमूर्ती नाष्टा सेंटर ओगलेवाडी, श्री विशाल अंकुश महाडीक राजमाची, ईगल इन्स्टिट्यूट ऑफ फायर अँड सेफ्टी कराड, श्रीशा ब्युटी पार्लर ओगलेवाडी, कै श्री आत्माराम बाबुराव खंडागळे कामथी, कै श्री चित्तरंजन रामचंद्र दळवी एम एस ई बी हजारमाची यांच्यातर्फे रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली. ट्रॉफी बजाज फायनान्स यांच्यावतीने ठेवण्यात आली होती.
पहिल्या गटात (पहिली व दुसरी ) जोशी श्रावणी मिथेरा, काटकर आरोही अनिल, भिलवडे मित्रांग अमोल यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा व कदम इरावती संदीप, रॉय आदित्य यांना उत्तेजनार्थ अशी बक्षीसे मिळाली. गट नंबर दोन (तिसरी व चौथी) मध्ये मोरे श्रुती दीपक, मगर जानवी दीपक, शेख बरीरा इमामपाशा यांनी अनुक्रमे पहिला दुसरा, तिसरा व लोहार आरोही अमोल, भट रमा अवधूत यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. गट नंबर तीन ( पाचवी व सहावी ) मध्ये मगदूम मिताली कृष्णा, बल्लाळ ओवी राहुल, मोहिते स्वरा सुरज यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय उत्तेजनार्थ मराठे निमेश निखिल, अवतारी आराध्या राजमाने यांना बक्षीस मिळाले. गट नंबर चार ( सातवी व आठवी ) मध्ये कचरे प्रचिती सतीश, पेढेकर प्रगती भानुदास, अंबिके जान्हवी सागर यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय उत्तेजनार्थ सरदेव समृद्धी प्रशांत, यादव श्रुती विजय यांना बक्षीस मिळाले. गट नंबर पाच (नववी व दहावी) मध्ये सुतार ओजस मदन, काटकर अनामित्रा अनिल, कमाने विनायक विजय यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय आणि उत्तेजनार्थ पिसाळ वेदांत अमोल, शिंदे दिग्विजय महेश यांना बक्षीस मिळाले.
एरिया सेल्स मॅनेजर बजाज फायनान्स श्री अजित पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, श्री शंकर हराळे, श्री अमर शेडगे श्री संतोष सुतार व आर्किटेक्ट श्री अजित डांगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सौ कविता डांगे यांनी सूत्रसंचालन केले, सौ सोनाली पाटील यांनी पाहुण्यांचे व स्पर्धेतील सहभाग विद्यार्थ्यांचे स्वागत केले, सौ अमृता निकम व सौ ज्योती जाधव यांनी कार्यक्रमाचे सर्व व्यवस्थापन केले. चित्रकार श्री दादासाहेब सुतार व कलाशिक्षक श्री जाधव सर यांनी स्पर्धेसंदर्भात मार्गदर्शन केले, ओम साई ग्रुप डांगे मळा वाघेरी यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहाय्य केल्याबद्दल संयोजक श्री अजित डांगे यांनी त्यांचे आभार मानले.