चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सध्या कोयना नदीपात्रातील पाणी प्रवाहित नाही, नदीचे पाणी पातळी खालावली आहे. या पाण्याचा पुरवठा कराड शहरात पालिकेकडून होत आहे. त्यामुळे शहरातल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी मौलिक आवाहन केलं आहे.
याबाबत पालिकेच्यावतीने दिलेल्या पत्रकात खंदारे यांनी म्हटले आहे की, कराड शहरातील सर्व नागरीकांना कळविणेत येते की, सध्या कोयना नदीपात्रातील पाणी पातळी खालावली असलेने, पाणी प्रवाहीत नाही. कराड नगरपरिषद, स्वच्छ व निर्जंतुक पाणी पुरवठा करणेची कार्यवाही करत आहेच. तरीही नागरीकांनी पिण्याचे पाणी गाळूण व उकळून पिण्यासाठी वापरावे. व पाण्याचा वापर काटकसरीने करुन, नगरपरिषदेस सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासक तथा मुख्याधिकारी खंदारे यांनी पालिकेच्यावतीने शहरातील नागरिकांना केली आहे.