योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचं संतुलन – शिवेंद्रसिंहराजे यांचा प्रेरणादायी संदेश – changbhalanews
आपली संस्कृती

योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचं संतुलन – शिवेंद्रसिंहराजे यांचा प्रेरणादायी संदेश

सातारा, 21 जून 2025 | चांगभलं वृत्तसेवा
🧘”योग हा आरोग्य आणि मनशांतीचा मूलमंत्र असून, तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवला पाहिजे,” असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे केले.

श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे जिल्हा प्रशासन, क्रीडा व आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना भोसले यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

🔰कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी आशिष बारकुल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, क्रीडा अधिकारी नितीन तारळक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

🗣️“हजारो वर्षांची आपली योगपरंपरा आरोग्यवर्धक असून, अनेक व्याधी दूर करणारी आहे. रोज योगासने केली, तर शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहते. त्यामुळे योगाला केवळ एक दिवस नव्हे, तर संपूर्ण आयुष्यात सामावून घ्या,” असे आवाहन करत भोसले यांनी सर्व नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या निमित्ताने जिल्हाभरात विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामूहिक योग प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.

————————————————————————-

🪷 “चांगभलं न्यूज”समाज घडवणाऱ्या बातम्यांचा विश्वासार्ह मंच.
🙏 तुम्हीही आजपासून सुरूवात करा – रोज काही मिनिटांचा योग तुमचं आयुष्य बदलू शकतो!
📬 तुम्हालाही तुमचा योगानुभव शेअर करायचा आहे का?
📧 आम्हाला लिहा: changbhalanews@gmail.com
📲 अधिक अपडेटसाठी भेट द्या 👉 www.changbhalanews.com

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close