येणपे, येवती ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली डॉ. अतुल भोसलेंची भेट !
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर उंडाळे विभागातील येणपे व येवती गावच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपचे नेते, डॉ. अतुल भोसले यांची भेट घेतली.
कराड तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत रेठरे बुद्रुक या सुमारे पाच हजार लोकसंख्येच्या मोठ्या गावात भाजप नेते, डॉ. अतुल भोसले यांच्या कृष्णा विकास आघाडीने सरपंच पदासह सर्वच्या सर्व जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. तर उंडाळकरांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कराड दक्षिणमधील उंडाळे विभागातील येणपे व येवती या गावातही प्रत्येकी दोन जागा खेचण्यात भाजपच्या भोसले गटाला यश आल्याचे समोर आले आहे.
या दोन्ही गावच्या नवनिर्वाचित सदस्यांमधील येवती ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले सागर शिवाजी शेवाळे व सौ. रंजना भानुदास बोरगावकर तसेच येणपे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेले पै. सचिन बबन बागट व एकनाथ रामचंद्र जाधव यांनी भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांची भेट घेतली आहे. त्यामुळे दोन्ही गावांतील हे चारही सदस्य भाजप नेते, डॉ. अतुल भोसले यांचे नेतृत्व मानणारे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या भेटीवेळी डॉ. अतुल भोसले यांनी नवनिर्वाचित चारही सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी येणपे, येवती सह उंडाळे विभागातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.