कराड मधील महिलांच्या ‘या’ सामाजिक क्लबला मिळाले विविध पुरस्कार
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
पनवेल येथे झालेल्या स्वर्णप्रभा या डिस्ट्रिक्ट असेम्ब्ली मध्ये वर्षभर केलेल्या क्लबच्या कामगिरीबद्दल इनरव्हील क्लब कराड संगमला विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डिस्ट्रिक्ट चेअरमन रचना मालपाणी यांच्या हस्ते हा बक्षीस समारंभ संपन्न झाला. इनरव्हीलचे हे 100 वे वर्ष असून कराड संगमचे 10 वे वर्ष आहे .गेली 10 वर्ष क्लबने विविध क्षेत्रात आपल्या चांगल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
यावेळी रचना मालपाणी यांनी प्रेसिडेंट तरुणा मोहिरे व सर्व क्लबचे कौतुक केले. क्लब सेक्रेटरी छाया पवार यांना ‘बेस्ट सेक्रेटरी’ ट्रेजरेर, सारिका शहा यांना ‘बेस्ट ट्रेजरर,’ आय एस ओ अंजना माने यांना ‘बेस्ट आय एस ओ’ ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच डिस्ट्रिक्ट 313 च्याअंतर्गत असलेल्या 77 क्लब मधून इनरव्हील क्लब कराड संगम ला इनरव्हील ब्रँडिंग व इमेज बील्डिंग , हॅपी स्कूल आणि वन मेंबर वन प्रोजेक्ट या बद्दल ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. क्लबने केलेल्या कार्याचे डिस्ट्रिक्ट चेअरमन रचना मालपाणी व सेक्रेटरी आशा देशपांडे, डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. शोभना पालेकर यांनी या वर्षी क्लबने राबविलेल्या उपक्रमाचे खूप कौतुक केले. क्लबने या वर्षी 126 प्रोजेक्ट केले. त्यामध्ये 1000 अंगणवाडी सेविकांचे मोफत कॅन्सर तपासणी, 100 मुले दत्तक घेऊन त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी विविध उपक्रम , गरजू मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप, बस स्टॉप उभारणी आदी उपक्रम राबविले. यावेळी क्लब प्रेसिडेंट अपूर्वा पाटणकर, सेक्रेटरी सारिका शहा , आयएसओ सारिका वेल्हाळ , एडिटर निमिशा गौर या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. सर्व क्लब मेम्बरच्या सहकार्याने हे यश मिळाले असल्याचे तरुणा मोहिरे आणि छाया पवार या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.