महिला मर्चंटने विधवा प्रथा मुक्तीच्याया दृष्टीने टाकले एक पाऊल पुढे..
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
मर्चट ग्रुप अध्यक्ष सत्यनारायण मिणीयार यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या महिला मर्चट नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कराडच्या वारूंजी शाखेचा नूतन वास्तू भूमिपूजन सोहळा गुरूवार दि. २५ जानेवारीला वारूंजी या ठिकाणी संपन्न झाला. या सोहळयाचे विशेष म्हणजे हे भूमिपूजन शहीदांच्या वीरपत्नी व विधवा महिलांच्या शुभहस्ते करण्यात आले. या माध्यमातून महिला मर्चटने विधवा प्रथा मुक्तीच्याया दृष्टीने टाकले एक पाऊल पुढे टाकले.
संस्थेच्या सभासद अर्चना जगन्नाथ पवार, वीरपत्नी अर्चना दत्तात्रय पवार, संचालक अनुराधा पावसकर, संगिता क्षीरसागर तसेच सभासद मनिषा सुर्वे, स्वाती पाटील, वृंदा माळी, अंजली बाकळे, शुभांगी मोरे, निर्मला पोळ, प्रतिभा राजे यांचे शुभहस्ते हा भुमिपूजन सोहळा संपन्न झाला.
या सोहळयात संस्थेच्या संस्थापिका सौ. भारती मिणीयार यांनी या महिलांना हळदी कुंकू लावून, तीळगुळ देवुन संक्रांत वाण वाटप केले. विधवा प्रथा मुक्तीसाठी महिला मर्चट संस्था यांनी राबविलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. विधवा महिलांना हळदी-कुंकू कार्यकमात, धार्मिक कार्यकमात मान न देणे, सौभाग्याचे लेणे न घालणे यासारख्या जुन्या चालीरीती, परंपरा या विधायक उपक्रमामुळे नक्कीच पुसल्या जातील. महिला मर्चंटने अशा प्रकारचा विधायक उपकम राबवून परिवर्तनाची मुहुर्तमेढ रोवली.
या समारंभास महिला मर्चंटचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, कराड मर्चंटचे संचालक, संस्थेचे शाखा सल्लागार सदस्य, ऑडिटर्स, कायदेशीर सल्लागार व विविध मान्यवर उपस्थित होते.