तारळी नदीत बुडून महिलेचा मृत्यू; आंबळे हद्दीत आढळला मृतदेह – changbhalanews
Uncategorized

तारळी नदीत बुडून महिलेचा मृत्यू; आंबळे हद्दीत आढळला मृतदेह

तारळे दि. २५ | चांगभलं वृत्तसेवा
मौजे आंबळे (ता. पाटण) येथील सौ. साधना रमेश सावंत (वय ४५) यांचा दुपारच्या सुमारास तारळी नदीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाचा शोध सुरू असताना काही वेळाने तो आंबळे हद्दीत नदीपात्रात आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह नदीतून बाहेर काढून पंचनामा केला असून, पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी (पोस्टमार्टम) पाठवण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close