मराठा समाजाला लागेल ती मदत करणार – भरत पाटील
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्क कार्यालय उद्घाटन राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (एनएमडीसी) चे संचालक भरत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अनिल ( बापू) घराळ, सातारा जिल्हाध्यक्ष अशोक चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष विवेक कुराडे पाटील, जिल्हा सरचिटणीस किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठा महासंघ गेले अनेक वर्षापासून मराठा समाजातील लोकांना न्याय देण्यासाठी काम करत आहे. इथून पुढेही संघटना मोठ्या जमाने काम करेल. कराड हे राजकीय, सामाजिक चळवळीचे ठिकाण आहे, अशा ठिकाणी संघटनेचे कार्यालय असणे खूप महत्त्वाचे आहे. कुठल्याही संघटनेला कार्यालय असल्याशिवाय बळ मिळत नाही, कारण कार्यकर्त्यांना बसण्यासाठी एक हक्काची जागा हवी असते. सर्वसामान्य माणसांना संपर्क साधता येत नाही. या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सुटतील. गेले अनेक वर्षापासून अनिलबापू घराळ हे मराठा समाजासाठी कार्य करत आहेत. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मराठा समाजासाठी लागेल ती मदत करणार असल्याचे यावेळी
भरत पाटील यांनी सांगितले.
भरत पाटील यांची भारत सरकारच्या स्टील मंत्रालयाच्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (एनएमडीसी) च्या संचालकपदी (केंद्रीय राज्यमंत्री दर्जा) तसेच त्यांची एनएमडीसी आणि एनएमडीसी स्टील्सच्या सीएसआर समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा उपाध्यक्ष धनाजी माने,
जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुरज जाधव,
सोशल मीडिया प्रमुख संदीप काळे, कराड शहराध्यक्ष युवराज कुराडे पाटील, कराड दक्षिण अध्यक्ष अमर पाटील , कराड दक्षिण तालुका खजिनदार विनोद पाटील, कराड दक्षिण तालुका उपाध्यक्ष तोहीद पटेल, शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष मनोज पवार, जयवंत पाटील, विद्या मोरे, अर्चना जाधव, स्नेहल थोरात, भास्कर थोरात, सुशांत इनामदार, प्रितेश पवार , सागर बर्गे, संजय पवार, राहुल जाधव, भूषण पाटील (संभाजी ब्रिगेड), सचिन पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.