सुर्लीच्या बैलगाडा शर्यतीची मानकरी ठरली वाघोलीची बैलगाडी!
एक लाखाचे पटकावले बक्षीस : युवा नेते रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सुर्ली ता.कराड येथे सातारा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “नमो चषक बैलगाडा स्पर्धेत ” यशवंत रामभाऊ जोशी व बापूसाहेब भाडळे वाघोली यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकांचे एक लाखाचे पारितोषिक व नमो श्री चषक पटकावला.
भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस व सातारा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक रामकृष्ण वेताळ, उद्योजक प्रदीप वेताळ, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, राजाराम गरुड, माजी पं.स.सदस्य चंद्रकांत मदने, कराड तालुका अध्यक्ष शंकरराव शेजवळ, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष प्रशांत भोसले, कराड उत्तर संयोजक महेशकुमार जाधव, नवीन जगदाळे, विश्वासराव काळभोर, उदय जगदाळे, दिपालीताई खोत, बाळासाहेब पोळ, मुरलीधर पोळ, जयसिंग डांगे यांसह भाजपा पदाधिकाऱ्यांच्या समवेत शर्यतीमधील विजेत्या बैलगाडी मालकांना रोख रक्कम, चषक व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
भाजपचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त सुर्ली येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. “नमो चषक बैलगाडा स्पर्धा” या नावाने आयोजित या स्पर्धेमध्ये एकूण 256 बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला. अतिशय अटीतटीच्या आणि चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत अनेक नामवंत बैलजोड्या सहभागी झाल्याने मैदानाची चुरस अखेरपर्यंत टिकून होती. सायंकाळी साडेसहा वाजता या मैदानाची अंतिम फेरी पार पडली आणि मैदानाचा विजयी गुलाल उधळण्यात आला.
शर्यतीमधील अनुक्रमे विजेत्या बैलगाड्या याप्रमाणे….
यामध्ये रामभाऊ जोशी व बापूसाहेब भाडळे वाघोली यांची बैलजोडी प्रथम, सदाशिव कदम रेठरे व बाबू माने घरनिकी द्वितीय, श्री. स्वामी समर्थ प्रसन्न विहापूर तृतीय, श्री. ज्योतिर्लिंग प्रसन्न डिके दाबा खाशाबा दाजी शिंदे सैदापूर चतुर्थ, बापूशेठ पिसाळ चोराडे पंचम, श्री. ज्योतिर्लिंग प्रसन्न एस. के. पाटील वाघेरी सहावा, तर कळंबा देवी प्रसन्न तांदळगाव आळसंद यांचा सातवा क्रमांक आला.
या बैलगाडा मैदानासाठी रामकृष्ण वेताळ यांनी प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये, उद्योजक प्रदीप वेताळ यांनी द्वितीय क्रमांकसाठी ७१ हजार रुपये, संतोष वेताळ भाऊ यांनी तृतीय क्रमांकासाठी ५१ हजार रुपये, अमित अशोक वेताळ यांनी ४१ हजार रुपये चतुर्थ क्रमांक, पी. आय. हनुमंत वेताळ यांच्याकडून पाचव्या क्रमांकासाठी ३१ हजार रुपये, शंकर वेताळ पाटील व मच्छिंद्र वेताळ यांनी सहाव्या क्रमांकासाठी २१ हजार रुपये व सोन्या ग्रुप सुर्ली यांनी सातव्या क्रमांकासाठी ११ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या सर्व बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सर्व विजेत्या स्पर्धकांना चषक, शाल, श्रीफळ,रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी समालोचक म्हणून सुनील मोरे पेडगाव, सूत्रसंचालक प्रकाश बुवा महागावकर, विजय यादव रामपूर, झेंडा पंच सलीम मुलानी, हलगी वादक बाळासाहेब साठे, मंडप अभिजीत पोळ यांनी सहकार्य केले. तर हे मैदान यशस्वी करण्यासाठी रामकृष्ण वेताळ युवा मंच कराड उत्तर यांनी प्रयत्न केले. प्रत्यक्ष मैदानावर राहुल वेताळ, विशाल वेताळ, शंकर वेताळ पाटील, विक्रम बनसोडे, रोहित डुबल, पंकज खंडागळे, अक्षय तुपे, विनय बनसोडे, गणेश वलेकर, सुरज वेताळ या तरुण कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. सातारा जिल्ह्यासह, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातून बैलगाडा शौकिनांनी या मैदानासाठी उपस्थिती लावली होती
उत्तम आयोजनासह चौदा देशात स्पर्धेचे प्रक्षेपण…
सातारा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक रामकृष्ण वेताळ यांच्या मार्गदर्शनानुसार या मैदानाचे अतिशय उत्तम असे नियोजन केले होते. कोणताही तंटा अथवा बखेडा न होता संपूर्ण मैदान वेळेत पार पडले. नियोजनबद्ध आखणी आणि योजनाबद्द यंत्रणा यामुळे हे मैदान सफल झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण चौदा देशांत करण्यात आले.