सातारा जिल्ह्यात 24 तासात कुठे किती पडला पाऊस – changbhalanews
Uncategorized

सातारा जिल्ह्यात 24 तासात कुठे किती पडला पाऊस

सातारा | चांगभलं वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार सुरुवात केली असून शनिवारी दि. 24 रोजीच्या सकाळी आठ वाचण्यापूर्वीच्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 33.4 मिमी इतका पाऊस झाला आहे. महाबळेश्वरला सर्वाधिक 55.7 मिमी इतका तर जावली-मेढा तालुक्यात अवघा 4.1 मिमी पाऊस झाला.

सातारा जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसाने जोरदार धरला आहे. या पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. छोटे ओढे, ओहोळ तुडुंब भरू लागले आहेत. तलावांची घटलेली पाणी पातळी काही प्रमाणात वाढू लागली आहे. शनिवारी सकाळी आठ वाजण्यापूर्वीच्या 24 तासात पुणे विभागात 32.3 मिमी इतका पाऊस झाला तर सातारा जिल्ह्यात सरासरी 33.4 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.‌

जिल्ह्यातील तालुकानिहाय झालेला पाऊस मिमी मध्ये याप्रमाणे – सातारा 34.9, जावळी मेढा- 4.1 मिमी, पाटण 30.8 मिमी, कराड 33.8 मिमी, कोरेगाव 34.7 मिमी, खटाव वडूज – 34.5 मिमी, माण दहिवडी – 34.3 मिमी, फलटण 24.3 मिमी, खंडाळा 25.9 मिमी, वाई 35.1 मिमी, तर महाबळेश्वर 55.7 मिमी.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close