सुर्ली येथे ग्रामस्थांनी उभारल्या गुढ्या ! – changbhalanews
आपली संस्कृती

सुर्ली येथे ग्रामस्थांनी उभारल्या गुढ्या !

निमित्त होतं प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचं

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर झालेल्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यावेळी कराड तालुक्यातील सुर्ली येथे ग्रामस्थांनी घरोघरी गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा केला. यानिमित्ताने विविध कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.

ग्रामस्थांनी सकाळी घरोघरी गुढी उभारून दीप प्रज्वलन केले. त्यानंतर सामूहिक ध्वजपूजन व आरती करण्यात आली, त्यानंतर ग्रामदिंडी काढण्यात आली. होमहवन विधी संपन्न झाला. यासोबतच ह. भ.प.अमोल महाराज सूळ यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले. भाविकांनी त्याचा लाभ घेतला. अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याचा लाभ ग्रामस्थांनी घेतला.

या सर्व भक्तीमय कार्यक्रमांमध्ये सुर्ली गावातील सर्व नागरिकांनी एकतेचे, समानतेचे आणि एकोप्याचे दर्शन घडवले. या एकात्मतेमुळे श्रीरामचंद्राच्या प्रतिष्ठाननेनिमित्त आयोजित कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर गेला. सर्वांच्या साथीने झालेली राम भक्ती ही अमृताचा आनंद देऊन गेली. या अमृत भक्तीमध्ये न्हाऊन निघण्याचे पूण्यकर्म ग्रामस्थांना एकीमुळे घडले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close