ॲड. उषा मिशाळ यांना राष्ट्रीय सामाजिक न्याय पुरस्कार प्रदान

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड येथील बार असोसिएशनच्या सदस्य, चिखली ता. कडेगाव च्या पोलीस पाटील ॲड. उषा मिशाळ-वायदंडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय सामाजिक न्याय पुरस्कार 2025 प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
समाजातील स्त्री -पुरुष समतेसाठी, पीडित महिलांच्या संविधानिक न्यायव्यवस्थे बाबत जागृती करणे, शाळा व महाविद्यालयात लैंगिक अत्याचार, गुड टच बॅड टच,पोस्को, बालविवाह, रॅगिंग याबाबत जागरूकता व मार्गदर्शन करणे,गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अनाथ-अपंग लोकांना मदत तसेच कायदेविषयक कलमे, गुन्हे व प्रतिबंधात्मक उपाय योजना यावर नियमित व्याख्याने देणे अशा समाजाभिमुख कार्याचा वसा घेतलेल्या ॲड.उषा मिशाळ वायदंडे यांना हुतात्मा अपंग बहूउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय सामाजिक न्याय पुरस्कार 2025 मडगांव गोवा येथील आयोजित समारंभात भारतीय जनता पार्टीचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक,गोव्याचे आमदार व कदंबा महामंडळ गोवा चे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी जयेश नाईक , डॉ. विलास मोरे, सुशांत शिवदास, डॉ.जालिंदर महाडिक, अमितकुमार डाइंगडे, डॉ. सुरेश नांदिवडेकर, डॉ. प्रशांत रत्नपारखी, जयवंतराव घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनील फडतरे यांनी समारंभाचे प्रास्ताविक केले व अमित अदवडे यांनी सूत्रसंचालन केले.