चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
येथील कृष्णा विश्व विद्यापीठात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कृष्णा न्यूरोसायन्सेस इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री ना. जे. पी. नड्डा गुरुवारी (ता. २२) कराडच्या दौऱ्यावर येणार होते. या पार्श्वभूमीवर भाजपा कराड दक्षिणच्यावतीने विंग येथे भव्य जनसंवाद मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते.
पण काही अपरिहार्य कारणांमुळे केंद्रीय मंत्री ना. नड्डा यांचा नियोजित कराड दौरा रद्द झाल्याने, गुरुवारी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती, भाजपा कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.