चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटार सायकल चोरणा-यास तांत्रिक पध्दतीने तपास करुन अटक केली आहे.
या वर्षी कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतुन बेमालुमपणे मोटार सायकली चोरीस गेल्या असलेने त्या सराईत चोरटयाचा शोध घेवुन त्यास अटक करुन गुन्हे उघडकीस आणणेकरीता पोलीस अधीक्षक यांनी कराड शहर पो. स्टे.चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उनिरीक्षक राजु डांगे यांना सुचेना केल्या होत्या. त्याप्रमाणे वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अंमलदारांकरवी तत्रिक माहीतीच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदार तयार करुन शोध घेवून कराड शहर पो. स्टे. हद्दीत गस्त करीत असताना संशयावरुन नितीन तुकाराम बसनुर, वय- 26 वर्षे, रा. येणपे (उंडाळे) ता. कराड या संशयितास दिनांक 10 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. चौकशीत त्याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यामुळे दुचाकी चोरीचे तीन गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. तिन्ही गुन्हयातील चोरलेल्या मोटार सायकली कराड शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत केलेल्या असुन सुमारे 1 लाख 10 हजार रुपयांच्या तीन मोटार सायकली हस्तगत केलेल्या आहेत. त्याचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येणेची शक्यता असून त्याबाबत तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप निरिक्षक आर. एल. डांगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केली आहे.