दोन वर्षे तडीपार असलेल्या दोघांना अटक, कराड डीबी शाखेची कामगिरी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
दोन वर्ष तडीपार असतानाही कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वावरताना आढळून आलेल्या जखिणवाडी येथील दोघांना कराड शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने अटक केली आहे. देवेंद्र ऊर्फ देवा येडगे , व पृथ्वीराज बाळासो येडगे दोघे रा. जखिनवाडी ता. कराड जि. सातारा अशी अटक केलेल्या संशयिताची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील (कराड शहर पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेला, दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी सांयकाळी 2 वर्षासाठी सातारा तसेच सांगली जिल्हयातील काही तालुक्यातून हद्दपार असतानाही देवेंद्र अशोक येडगे रा. जखिनवाडी ता. कराड जि. सातारा हा कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील जखिणवाडी ता. कराड जि. सातारा येथे छुप्या स्वरुपात वावरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक के.एन. पाटील यांना ही माहिती मिळाली होती. सदरची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी पोलीस उप निरिक्षक पतंग पाटील यांना त्याबाबत माहिती देवुन तात्काळ डी. बी. टीम सह रवाना केले असता संशयित आरोपी देवेंद्र ऊर्फ देवा येडगे हा जखिनवाडी गावचे चौकात बिरोबा मंदीर शेजारी दहशत माजवताना मिळुन आला. पोलीसांची चाहुल लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व पथकाने पाठलाग करुन सदर आरोपीस ताब्यात घेतले असुन त्यास अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, सातारा तसेच सांगली जिल्हयातील काही तालुक्यात प्रवेश नसताना देखील दुसरा संशयित पृथ्वीराज बाळासो येडगे रा. जखिनवाडी ता. कराड जि. सातारा हा कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील कोयना वसाहत मलकापुर येथे छुप्या स्वरुपात वावरत असल्याची गोपनीय माहिती कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरिक्षक पतंग पाटील यांना मिळाली होती. पोलीस उपनिरिक्षक पतंग पाटील यांनी तात्काळ डी. बी. पथकासह कोयना वसाहत मलकापुर याठिकाणी दाखल होवुन पृथ्वीराज बाळासो येडगे यास सापळा रचुन अटक केली.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक पतंग पाटील, स.फौ. रघुवीर देसाई, स.फौ देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, संतोष पाडळे, कुलदिप कोळी, महेश शिंदे, आनंदा जाधव, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ यांनी केली.