त्रिणय सुमित स्पोर्ट्सने पटकावले कराड प्रीमियर क्रिकेट लीगचे विजेतेपद
सौरभ पाटील, विनायक भोसले यांच्या उपस्थितीत झाले बक्षीस वितरण

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर झालेल्या ‘कराड प्रीमियर लीग २०२३’ या चौथ्या स्पर्धेचे विजेतेपद त्रिणय सुमित स्पोर्ट्स वॉरियर संघाने पटकावले. विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियम येथे आय.पी.एलच्या धर्तीवर “कराड प्रीमियर लीग २०२३ पर्व ४” या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामना पार पडला. या सामन्याच्या नाणेफेक व बक्षीस वितरणप्रसंगी कृष्णा विश्व विद्यापीठचे विश्वस्त विनायक भोसले, माजी नगरसेवक सौरभ पाटील, पोपटराव साळुंखे, माजी नगरसेवक सुहास जगताप, माजी नगरसेवक किरण पाटील, संदीप पवार, राजु मुल्ला, राकेश शहा, संग्रामसिंह कदम, देवेंद्र बागल, सचिन पाचपुते, जमीर मनेर, पोलीस उपनिरीक्षक अमीत बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.
“कराड प्रीमियर लीग पर्व ४” ही स्पर्धा अतिशय उस्फुर्त प्रतिसादात पार पडली. संपूर्ण कराड तालुक्यातील टेनिस क्रिकेट मधील क्रिकेटपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. अंतिम सामन्यामध्ये त्रिणय सुमित स्पोर्ट्स वॉरियर विरुद्ध सनी स्पोर्ट्स इंदोली यांच्यामध्ये रोहमर्षक लढत झाली. यामध्ये त्रिणय सुमित स्पोर्ट्स वॉरियर या संघाने ७ षटक व चार चेंडूत ८७ धावांचे आव्हान पुर्ण करून कराड प्रीमियर लीग पर्व ४ चे विजेतेपद पटकावले.