जीवन पवार यांना टिळक हायस्कूलचा “विद्या भुषण” पुरस्कार जाहीर
उद्या मान्यवरांच्या हस्ते होणार समारंभपूर्वक वितरण
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सातारा , सांगली जिल्ह्यातील अनेक प्रशासकीय अधिकारी घडवलेले जीवन पवार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विद्यानगर सैदापूर ता. कराड या संस्थेचे संस्थापक , संचालक जीवन मोहनराव पवार यांना टिळक हायस्कूलकडून यंदाचा “विद्या भुषण पुरस्कार” जाहीर झाला आहे. शनिवार दि २ डिसेंबर २३ रोजी लाहोटी कन्या प्रशाला,कराड येथे सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
जीवन पवार यांना या पूर्वी “राष्ट्रपती पुरस्कार”, “भारत गौरव”, “महाराष्ट्र रत्न”, टिळक हायस्कूलचा “प्रेरणा पुरस्कार” व कराडचा प्रतिष्ठित “कराड गौरव” अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. जीवन पवार यांनी गेल्या ३६ वर्षात सामान्य कुटूंबातील अनेक तरुणतरुणींना मार्गदर्शन करून हजारो प्रशासकीय अधिकारी घडवले आहेत.
दरम्यान, पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जीवन पवार यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.