चांगभलं ऑनलाइन | मुंबई
महायुतीच्या (mahayuti) जागा वाटपाबाबत (seat sharing) गेल्या काही दिवसांपासून नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहेत. महाराष्ट्रातील ४५ जागांवर महायुतीचा झेंडा फडकवण्याचा नेत्यांचा विचार सुरू आहे. भाजपने महाराष्ट्रातील २० जागा जाहीर केल्या आहेत , तरीही शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र शिंदे गट १४ जागा लढवणार असल्याचे समोर आले असून १२ जागांवरील संभाव्य उमेदवारांची यादीच राज्यातील एका दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीने जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्यातील शिंदे गटाच्या तीन विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
रामटेकचे खासदार कृपालजी तुमाणे आणि कोल्हापूचे खासदार संजय मंडलिक यांना डच्चू मिळण्याची तर या दोघांसह तीन विद्यमान खासदारांची जागा धोक्यात असल्याचे समोर आले आहे.
लोकसभा मतदारसंघनिहाय संभाव्य उमेदवार यादी?
१) हेमंत पाटील, हिंगोली
२) श्रीरंग बारणे, मावळ
३) भावना गवळी, वाशिम (यांना डच्चू मिळून संजय राठोड यांना उमेदवारी मिळू शकते)
४) धैर्यशील माने, हातकणंगले
५) सदाशिव लोखंडे, शिर्डी
६) हेमंत गोडसे, नाशिक
७) कृपालजी तुमाणे, रामटेक (यांना मिळू शकतो डच्चू)
८) श्रीकांत शिंदे, कल्याण
९) राहुल शेवाळे, इशान्य मुंबई
१०) राजेंद्र गावीत, पालघर (ही जागा भाजपकडे जाऊ शकते किंवा गावीत शिवसेनेचे उमेदवार असु शकतात )
११) प्रतापराव जाधव, बुलढाणा
१२) संजय मंडलिक, कोल्हापूर (डच्चू मिळण्याची शक्यता)
राज्यातील लोकसभेच्या एकूण जागांपैकी ३१ ते ३२ जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला १२ ते १३ जागा आणि अजित पवार गटाला ४ जागा मिळू शकतात. जागावाटपाचा अंतिम निर्णय हा दिल्लीत होणार असल्याचं या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने स्पष्ट केले आहे.