तीन पिस्तूले, दोन कट्टे, वाघांची नखे जप्त – changbhalanews
क्राइम

तीन पिस्तूले, दोन कट्टे, वाघांची नखे जप्त

एलसीबीची धडाकेबाज कामगिरी

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी

साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने धडाकेबाज कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून ३ गावठी पिस्तूले, २ गावठी कट्टे, ७८ जिवंत काडतुसे, ३७० वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या, २ तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे, वाघाचे नख असा ६ लाख २० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख, व अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी सातारा जिल्हयातील बेकायदेशिर शस्त्र बाळगणाऱ्या इसमांच्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिले होते. त्याप्रमाणे पोनि अरुण देवकर यांनी सपोनि रविंद्र भोरे व पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, अमित पाटील यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष तपास पथक तयार केले.

दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना, बावधन नाका वाई येथील पोलीस रेकॉर्डवरील संशयीत अविनाश मोहन पिसाळ रा. बावधन नाका ता. वाई जि. सातारा याच्याकडे बेकायदेशिर देशी बनावटीचे पिस्तूल असून, त्यास शिकारीचा छंद असून त्याच्याकडे वन्यजीव प्राण्यांचे अवयवही आहेत, अशी माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने सपोनि रविंद्र भोरे यांच्या पथकास त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सपोनि रविंद्र भोरे व त्यांचे पथकाने वनविभाग वाई येथील अधिकारी यांना सोबत घेवून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी छापा टाकुन पोलीस रेकॉर्डवरील संशयीत अविनाश पिसाळ यांच्याकडून ३ गावठी पिस्तूल, २ गावठी कट्टे, ७८ जिवंत काडतुसे, ३७० वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या, २ तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे, वाघाचे नख असा ६,२०,३००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्याचे विरुध्द वाई पोलीस ठाण्यास शस्त्र अधिनियम व वन्यजीव सरंक्षण अधिनियमातर्गत व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर,, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोउनि पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, प्रविण फडतरे, सनी आवटे, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, स्वप्नील कुंभार, ओमकार यादव, विक्रम पिसाळ, मोहन पवार, अरुण पाटील, विशाल पवार, प्रविण पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, मयूर देशमुख, वैभव सावंत, संकेत निकम, शिवाजी गुरव, संभाजी साळुंखे, पंकज बेसके, अमृत कर्पे सायबर विभागाचे अमित झेंडे, अजय जाधव यांनी सहभाग घेतला असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close
WhatsApp Group