कोल्हापूर जिल्ह्यातील तिघेजण अपघातात जागीच ठार – changbhalanews
क्राइमराज्य

कोल्हापूर जिल्ह्यातील तिघेजण अपघातात जागीच ठार

कराडजवळ आयशरला ट्रक-कारची धडक

कराड | प्रतिनिधी
पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराडनजिकच्या पाचवड फाटा येथे हॉटेल रायगडसमोर मालट्रक आणि चारचाकी व्हॅगनर कारचा भीषण अपघात शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास झाला. या अपघातात बहिण, भाऊ आणि भाचा जागीच ठार झाला आहे. मृत तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील असून भाऊ नितीन पोवार हे कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी आहेत. नितीन बापूसाहेब पोवार (रा. कोल्हापूर राजवाडा), मनीषा आप्पासाहेब जाधव आणि अभिषेक आप्पासाहेब जाधव (दोघेही रा . जरळी, ता. गडहिंग्लज, जि . कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळील पाचवड फाटा येथे शनिवारी दुपार दीडच्या सुमारास व्हॅगनर कार कोल्हापूर बाजूकडून कराडच्या दिशेने येत होती. यावेळी पुढे जात असलेल्या माल ट्रकला कारची पाठीमागून जोरात धडक बसली. या भीषण धडकेत कारचा पुढील भाग हा ट्रकच्या पाठीमागील भागात घुसून भीषण अपघात झाला. या अघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृत तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील असून मृत झालेले नितीन पोवार हे कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी आहेत. नितीन बापूसाहेब पोवार (रा. कोल्हापूर राजवाडा), त्यांची बहीण मनीषा आप्पासाहेब जाधव आणि भाचा अभिषेक आप्पासाहेब जाधव (दोघेही रा . जरळी, ता. गडहिंग्लज, जि . कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच डीपी जैन पीआरओ ऑफिसर दस्तगीर आगा व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कारमधून मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवले. घटनास्थळी दाखल झालेल्या कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी व महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी यांनी अपघातग्रस्त वाहनांचे अडथळे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. नितीन पोवार हे बहिण व भाच्या समवेत पुण्याला जात असताना हा भागात झाल्याची माहिती समोर येत आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close