डोंगर कपारीत वसलेल्या ‘या’ गावाला आमदार बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून मिळाला पक्का रस्ता – changbhalanews
राजकियराज्य

डोंगर कपारीत वसलेल्या ‘या’ गावाला आमदार बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून मिळाला पक्का रस्ता

डांबरी रस्त्याला जोडलं जाणार दुर्गम गाव

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील तीर्थक्षेत्र पाली ता. कराड गावचा एक भाग असलेल्या डोंगरकपारीतील भगतवाडी या गावाला पक्का रस्ता नव्हता, आदरणीय पी. डी.पाटीलसाहेब यांनी सुरुवातीला कारखान्याच्या माध्यमातून जेसीबी, पोकलेनच्या साहाय्याने रस्त्याचे रुंदीकरण- खडीकरण केले होते, तद्नंतर मला मतदार संघातील जनतेने विधानसभा सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली, त्या माध्यमातून मी वेळोवेळी टप्प्याटप्प्याने या रस्त्याला निधी उपलब्ध करून रस्त्याचे खडीकरण करून घेतले. मात्र बऱ्याच दिवसापासून सदरचे गाव डांबरी रस्त्याला जोडण्याबाबतची माझ्या मनात इच्छा होती, परंतु शासनाच्या अनेक योजनांतून प्रयत्न केला असता लोकसंख्येच्या निकषामुळे हे काम होऊ शकले नव्हते. राज्याच्या सहकार व पणनमंत्री पदाची आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकार त्या त्या पालकमंत्र्यांकडे दिल्याने त्या माध्यमातून मी या रस्त्यासाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला, या निधीतून भगतवाडी या गावाला डोंगरकपारीतून डांबरी रस्ता होणार असून, हे गाव पालीला जोडले जाणार असल्याने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मतदारसंघातील एक गाव डांबरी रस्त्याला जोडणार असल्याचे समाधान मिळाले, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.

भगतवाडी ता.कराड येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, सह्याद्रि सहकारी साखर कारखाना संचालक सर्जेराव खंडाईत, माजी संचालक भास्करराव गोरे, जयवंतराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी देवराजदादा पाटील म्हणाले की, कराड उत्तर मतदार संघामध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत, भगतवाडी हा पाली गावचा एक वॉर्ड आहे, या गावच्या सुखदुःखामध्ये आम्ही सर्व पाली ग्रामस्थ सहभागी असतो, आमदार बाळासाहेब पाटील देखील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, तसेच आपणही त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांचे व आदरणीय पवारसाहेबांचे हात बळकट करावेत असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्र.२ – मरळी ते भगतवाडी रस्ता सुधारणा करणे या कामाचे भूमिपूजन, अंगणवाडी इमारतीचे उदघाटन, नवीन ट्रान्सफॉर्मरचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी भास्करराव गोरे, सर्जेराव खंडाईत, जयवंतराव साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी विष्णुपंत गोरे, जगन्नाथ पालकर, महेश पाटील, संजय गोरे, सयाजी दळवी, संजय खंडाईत, जालिंदर खोचरे, उत्तम गोरे, प्रमोद ढाणे, ज्ञानेश्वर जाधव, विलास खांबे, सुहास कदम, जयवंत कदम, संजय कदम, दत्तात्रय गोसावी, संजय सावंत, दीपक पडवळ, अमोल सरकाळे, अधिक मराठे, संदीप काटे, मारुती मस्कर, अशोक हरणे, भास्कर कुंभार, बी.डी. साळुंखे, हणमंतराव खबाले, सतीश शिंदे, दादासो कदम, नारायण जाधव, मुंबई मंडळाचे अध्यक्ष बबन साळुंखे, उपाध्यक्ष बाजीराव साळुंखे, दत्तात्रय साळुंखे, गजानन भोसले, हनुमंत साळुंखे, बबन भोसले, युवराज पवार, जगन्नाथ साळुंखे, किसन मसुगडे, आनंदराव साळुंखे, विलास साळुंखे, आबासो साळुंखे, प्रकाश साळुंखे, ज्ञानदेव जाधव, दीपक साळुंखे, संतोष साळुंखे, बजरंग पवार, चंद्रकांत भोसले, शुभम साळुंखे, विक्रम पवार, राहुल भोसले, ओंकार साळुंखे, संदीप साळुंखे, अजय साळुंखे, सौ.रंजना साळुंखे, सौ.किसाबाई साळुंखे, सौ.शांताबाई भोसले, सौ.सविता साळुंखे, सौ.रुक्मिणी साळुंखे, सौ मंदा साळुंखे, पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे उपअभियंता ए.एम.भंडारे, शाखा अभियंता विजय जाधव, महावितरणचे एच. ए. पिसाळ, ठेकेदार उदय जाधव, दिगंबर डांगे, शेखर पाटील, हणमंत घाडगे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close