लोकसभेची ही निवडणूक देशाचे धोरण ठरविणारी
महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना विजयी करा ; ना. चंद्रकांत पाटील
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
लोकसभेची निवडणूक ही देशाचे धोरण काय असावे, हे ठरविणारी निवडणूक आहे. यावेळीही मोदीच निवडून येणार याची खात्री विरोधकांनाही आहे. त्यामुळे ‘अबकी बार ४०० पार’चे ध्येय्य साध्य करण्यासाठी आणि देशाच्या भवितव्यासाठी देशाचे हित बघणारे मोदी सरकार पुन्हा आणण्यासाठी, सातारा लोकसभेतून भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी केले.
भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ गोवारे विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब महाडीक यांच्या घरी आयोजित बैठकीत ना. पाटील बोलत होते. भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले , प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना, आपल्या भागात मोठा विकासनिधी दिला. ज्याचा दीर्घ लाभ इथल्या लोकांना होताना दिसतोय. आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जनसामान्यांसाठी अनेक विकास योजना राबविल्या जातायत. विकासाची ही गंगा अव्याहतपणे सुरु ठेवण्यासाठी आणि विकसित भारताचे नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, उदयनराजे भोसले यांना खासदार म्हणून सातारा लोकसभेतून प्रचंड मतांनी निवडून पाठवावे.
यावेळी गोवारे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संपतराव पाटील, माजी चेअरमन बाळासाहेब महाडीक, बळवंत देसाई, सागर भोसले, अमोल देशमुख, अनुप जाधव, ओम पाटील, ॲड. जितेंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.