यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शन बुधवारपर्यत खुले राहणार
'डॉग शो'मध्ये विविध प्रकारच्या श्वानांनी वेधले लक्ष
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेले १८ वे स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन प्रतिवर्षी प्रमाणे दिनांक २४ ते २८ नोव्हेंबर पर्यत होते, मात्र शेतकरी, स्टॉल धारक यांचे आग्रहास्तव प्रदर्शन एकदिवसाने वाढवून बुधवार २९ पर्यत खुले राहणार असल्याची माहिती शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांनी दिली आहे.
दरम्यान, प्रदर्शनात डॉग शो प्रदर्शन स्पर्धा पार पडली. डॉबरमॅन, रॉटविलर, जर्मन शेफर्ड, पग, पामेरियन, पश्मी, कारवानी अशा विविध जातीचे शान प्रदर्शनात लक्ष वेधून घेत होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
आजपर्यंत या प्रदर्शनास ७ ते ८ लाख लोकांनी भेट दिली असून रविवारी व सोमवारी भेट देणाऱ्या शेतकरी, ग्राहक, विद्यार्थी भेटीने गर्दीचा उच्चाक झाला होता. मंगळवार एक दिवसच प्रदर्शनाचा उरला होता, मात्र गर्दी, शेतकरी, स्टॉल धारक यांची मागणी विचारात घेऊन बुधवार दि. २९ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रदर्शन खुले ठेवण्यात येणार आहे. याचा लाभ शेतकरी, ग्राहक यांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.