राजे उमाजी नाईक स्मारकासाठी राज्य शासनाने सुसज्ज आराखडा आणि निधीची तरतूद करावी
जय मल्हार क्रांती संघटनेचे दौलतनाना शितोळे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना उमाजी शितोळे यांनी आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे भिवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील राष्ट्रीय स्मारक स्मारकासाठी राज्य शासनाने दहा एकर जागा देऊन त्याचा सुसज्ज आराखडा तयार करून तो राबवावा, या मागणीचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.
तसेच रामोशी, बेरड, बेडर आरक्षणाबाबत आणि आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाबाबत, बेडर, बेरड, रामोशी समाजावर गावगुंड व पोलीस खात्याकडून होणारा नाहक त्रास थांबविण्याबाबत सविस्तर यावेळी शितोळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यात केली. या मागण्याबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच निर्णय घेऊ, अशी ग्वाही ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली.
दरम्यान, बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे फेब्रुवारी 2024 रोजी
वेळ- सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या वेळेत जय मल्हार क्रांती संघटनेकडून आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 192 वी पुण्यतिथी व मानवंदना सोहळा आयोजित करण्यात आला आहे. लोकनेते दौलतनाना उमाजी शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. तरी महाराष्ट्रातील तमाम रामोशी, बेरड, बेडर समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.