बिबट्याच्या आजारी बछड्याला कराड वनविभागाने उपचारासाठी पुण्याला पाठवले – changbhalanews
निसर्गायन

बिबट्याच्या आजारी बछड्याला कराड वनविभागाने उपचारासाठी पुण्याला पाठवले

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
तळबीड येथील शेतकरी अरुण किसन चव्हाण वस्ती गट नंबर 358 मध्ये बिबट्याचे मादी जातीचे पिल्लू आजारी अवस्थेत शनिवारी आढळून आले. सदर मादी पिलास कराड वनविभागाने ताब्यात घेऊन तात्काळ पशुवैद्यकीय दवाखाना कराड येथे नेले. तेथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यास पुढील उपचारांसाठी रेस्क्यू सेंटर पुणे येथे पाठवण्यात आले.

सदरची कार्यवाही उपवनसंरक्षक सातारा आदिती भारद्वाज यांच्या मार्गद्शनाखाली मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल कराड तुषार नवले यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल वराडे सागर कुंभार, वनरक्षक सचिन खंडागळे, अरविंद जाधव वनमजूर, मोहन भंडलकर, वनसेवक शंभूराज माने, अनिल कांबळे, भाऊसो नलवडे, वाहन चालक हनमंत मिठारे कराड वाईल्डलाईफ रेस्क्यूरस टीमचे अजय महाडीक, रोहीत कुलकर्णी, गणेश कोळी , सचिन मोहिते, रोहीत पवार, रोहन वेळापुरे, मयुरेश शानभाग आदींनी केली.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close