कराडच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका : डॉ. अतुलबाबा भोसले
डॉ. अतुलबाबांच्या प्रचारार्थ शहरात पदयात्रा
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड दक्षिणसाठी महायुती सरकारच्या माध्यमातून ७४५ कोटींहून अधिक विकासनिधी आणला आहे. त्याचबरोबर कराड शहरामध्ये कोट्यवधींची विकासकामे आणली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, वाखान रोड अशा कामांसाठी महायुती शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. कराड शहराच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करत असून, येत्या काळात कराडकरांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव कटीबद्ध राहीन, अशी ग्वाही डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.
कराड दक्षिण मतदारसंघातील भाजपा – महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ कराड शहरात पदयात्रा काढण्यात आली. श्री गणपती मंदिर तेली गल्ली, आझाद चौक, भोई गल्ली, डवरी गल्ली, सात शहीद चौक, रंगारवेस येथील श्री मारुती मंदिर या मार्गावर पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला कराडकरांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. अतुलबाबांनी या मार्गावरील प्रत्येकाशी हस्तांदोलन करत, तसेच संवाद साधत पदयात्रा काढली.
यावेळी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, कराड शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. येत्या काळात कराड शहरातील सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा मार्गी लावून, कराडमधील सर्वप्रकारच्या समस्या सोडविण्यावर माझा भर राहणार आहे. कराडकरांनी आपले प्रेम कायम ठेवून, मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे.
यावेळी कराडचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष डुबल, भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, रणजीत पाटील, उमेश शिंदे ,अजय पावसकर, मुकुंद चरेगावकर, किरण मुळे, समाधान चव्हाण, संग्राम चव्हाण, विक्रम भोपते, नितीन शहा, अभिषेक भोसले, प्रमोद शिंदे, श्री. आंबेकरी यांच्यासह कार्यकर्ते विविध पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.