मोहिते कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, दि. 7 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी बेलवडे बुद्रुक, ता. कराड येथील सरपंच डॉ. सुशांत मोहिते, माजी उपसरपंच पै. संभाजी मोहिते आणि प्रथितयश विधीज्ञ अॅड. वसंतराव मोहिते यांनी सपत्नीक, तसेच आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांसह मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी अॅड. वसंतराव मोहिते म्हणाले, मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकांने आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. तरच लोकशाही बळकट होऊन देशाला एक स्थिर सरकार मिळेल.
सरपंच डॉ. सुशांत मोहिते यांनी सर्व ग्रामस्थांना मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच गावातील दोन्ही मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांना सहकार करण्याची आवाहनही त्यांनी यावेळी केले. एकंदरीत बेलवडे बुद्रुक येथील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.