राजकिय
घरनिकी गावच्या नूतन सरपंचांचा झाला सत्कार

चांगभलं ऑनलाइन | आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी (जि. सांगली) तालुक्यातील घरनिकी ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच आप्पासाहेब पवार यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल समस्त होलार समाज व आर पी आय (आठवले) पक्ष कलाकार संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष सुनील तोरणे व महिला आघाडीच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षा सौ. अश्विनी सुनिल तोरणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी सरपंच नारायण पवार, विक्रम डाइंगडे, शिवाजी येळे, अरुण (शेठ) पवार, शिवाजी पवार, इलाई शेख, धनाजी माने, बाबू तोरणे, युवराज तोरणे, दत्ता तोरणे, बालाजी तोरणे, लालासो तोरणे, सचिन एवळे, संजय खांडेकर, लखन एवळे, सुखदेव खांडेकर, महालिंग तोरणे, शिवाजी खैरमोडे, सोनू रजपूत, सुमित पवार, सामाजिक कार्यकर्त्या रिटा माने (खरसूंडी) यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.